Tuesday 24 May 2016

मंगलाष्टके!


[चाल: स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं... ]

आईने तुज घास भरविला संतुष्ट तो खाउन।
गोटाही तुळतुळीत करुनी शुभचिन्ह वर काढुन।
नेसोनी लघुवस्त्र एक कटिला दंडास उंचावुन।
झाला आज इथे प्रकट हो पृथ्वीवरी वामन।।

सुमुहूर्त सावधान...

जाशी आज गुरुमंदिरी ममसुता चिंता मनी ना धरी।
मायाही करी, तोहि तुजवरी या आईवडिलांपरी।
ज्ञानामृत देउनी वरि करी तेजस्वि सूर्यापरी।
आशीर्वाद समस्त साथ असती ब्रह्मव्रता तू धरी।।
सुमुहूर्त सावधान...

-अनिरुद्ध रास्ते
(सर्व बटूंना आशीर्वाद म्हणून ही मंगलाष्टके! मुक्तपणे वापरू/पुढे पाठवू शकता!)

2 comments:

  1. वा मस्त, संपूर्ण मौंजीव्रताचे सार यात आहे.

    ReplyDelete
  2. वा मस्त, संपूर्ण मौंजीव्रताचे सार यात आहे.

    ReplyDelete